!! सद्गुरूचे नाम सोडू नका !!

संकल्प हि फार मोठी शक्ती आहे. इच्छा जर खरोखर अति प्रबळ झाली, तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच, भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर सद्गुरू भेटतात. प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळविल्या, तरी त्या स्वभावतःच अपूर्ण असल्यामुळे, आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात, आणि नंतर आपोआप नाहीशा होतात.म्हणून नेहमी 'सद्गुरू मला हवा' अशी इच्छा करीत जावे. त्याचे नाम घेणे, म्हणजे 'तू मला हवास' असे म्हणणेच होय. खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार सद्गुरूवर टाकला, तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो. आपला देह आणि प्रपंच सद्गुरूच्या
सत्तेने चालतो, हि जाणीव सतत ठेवून जगात वागावे, म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही...
Share :
About the Author: This post is written by Abhijit


Read More