सद्‍गुरु कुणाला म्हणतात ? त्यांचे खरे स्वरूप कोणते आहे ?

प्रश्न : सद्‍गुरु कुणाला म्हणतात ? त्यांचे खरे स्वरूप कोणते आहे ?

उत्तर : सत अशा स्वरूपास दाखवितो तो सद्‍गुरु. देह हे सद्‍गुरूंचे खरे स्वरूप नव्हे. सद्‍गुरु म्हणजे केवळ देहाकृति नव्हे. निखळ चैतन्य म्हणजेच सद्‍गुरु. सोहंच्या स्वरूपात सद्‍गुरु नटलेले आहेत. चित्शक्ति, चैतन्य, सद्‍गुरु हे सर्व एकच आहेत. सद्‍गुरु त्रिगुणांचे अतीत असतात.

सोहंकडे ध्यान लागले पाहिजे. साधनाच्या अभ्यासात राहिल्याशिवाय सोहंरूपाची ओळख होणार नाही.

चैतन्यरूप सद्‍गुरूंची पाऊलेसुद्धा चैतन्यरूपच आहेत. सहस्रदलात जी सो%हंगति आहे, ती गति म्हणजेच सद्‍गुरुचरण; तेच चरण गतिरूप आहेत.

`ब्रह्मानंदं परमसुखदं' इत्यादि श्लोकात सद्‍गुरूंचे खरे स्वरूप सांगितलेले आहे. ते असे :- ज्यात ब्रह्मानंदाची प्राप्ति आहे, जे अखंड सुख आहे, ज्या ज्ञानातून ज्ञान आणि अज्ञान यांची उत्पत्ति आहे, जे द्वैतापलीकडे आहे, जे आकाशाप्रमाणे अमाप व अगोचर आहे, जे सर्वांत साक्षीरूपाने आहे, ज्यात चंचलता नाही, जेथे भाव नाहीत, जे त्रिगुणरहित आहे, असे सद्‍गुरूंचे स्वरूप आहे. सद्‍गुरूशिवाय दुसरा देव नाही.

...............................................!! ॐ गुरुदेव !!......................................................
- Prashant Dhanwate
Share :
About the Author: This post is written by Abhijit


Read More